आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतमालाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवेदन..

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ ,मोसीन काठेवाडी
दिनांक – १६ एप्रिल २०२१, रोजी आंबेगाव तालुका गटविकास आधिकारी व आंबेगाव तालुका तहसीलदार यांना घोडेगाव येथील कार्यालयात अवकाळी पावसाने झालेल्या शेतमालाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी बाबद निवेदन व सात दिवसात कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला.

दिनांक ११ मार्च २०२१ रोजी झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे आदिवासी पश्चिमपट्टा, पूर्व पट्टा व इतर तुरळक भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्यांना पिकवलेल्या शेतमालाचे व शेतीचे पूर्णतः नुकसान झाले. तसेच काही घरे व इतर आर्थिक नुकसान झाले याबाबत प्रशासकीय अधिकारी यांनी संवेदनशील होऊन संबंधित शेत्रातील शेतीचे पंचनामा करून नुकसानीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी असे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या कडून निवेदन देण्यात आले.

या निवेदनात प्रहार जनशक्ती पक्षाकडून किमान ७ दिवसाच्या आत पंचनामे व तदनंतर ७ दिवसात आर्थिक मदत नुकसान भरपाई म्हणून मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित विषयावर ७ दिवसात कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास किंवा पंचनामे न झाल्यास आजपासून ठिक ८ दिवसानंतर प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतमजूर व शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून सविनय मार्गाने शांतता, कायदा व सुव्यवस्था यांचे पालन करत, करोना महामारी याचे नियम पालन करत अमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहारचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष योगेश महाराज राऊत यांनी दिला आहे.

प्रहार जन शक्ती पक्ष व शेतकरी हे उपोषणाला बसल्यावर संबंधित जिवितहानी किंवा आरोग्यहानी यांसारख्या गोष्टीसाठी उपोषण दरम्यान झाल्यावर प्रशासकीय अधिकारी जबाबदार रहातील असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

या वेळी योगेश महाराज राऊत
पुणे जिल्हा उपाध्यक्ष, जितुभाऊ भालेराव आंबेगाव तालुका अध्यक्ष , रामदास तोत्रे प्रहार कामगार संघटना व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते . या निवेदनामुळे प्रहारचे शेतकरी वर्गाकडून आंबेगाव तालुक्यात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *