श्री क्षेत्र ओझर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गंगा आरती संपन्न

दि.१३ मार्च २०२३ (ओझर)

ओझर प्रतिनिधी :- मंगेश शेळके


श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे सन्मानीय अध्यक्ष मा.श्री गणेशभाऊ कवडे व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ओझर येथे अष्टविनायकांमध्ये संकष्टी चतुर्थीच्या,शुभमुहूर्तावर गंगा आरती संपन्न झाली. पौराणिक मान्यतेनुसार जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी माता गंगा पृथ्वी तलावर अवतरली होती, गंगामाता पृथ्वीतलावर अवतरली तो दिवस गंगा दसरा म्हणून साजरा केला जातो.राजा भगीरताच्या प्रचंड तपशर्य मुळे पृथ्वीतलावरील लोकांना गंगामातेचे आशीर्वाद सतत मिळत असतात व मानवी जीवनातील वैराण वाळवंटामध्ये केवळ आणि केवळ गंगामातेमुळेच हिरवळ निर्माण झाली आहे.अशा वंदनीय,पूजनीय गंगामातेची गंगा आरती या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी संपन्न होत असताना या आरतीसाठी सौ.आशाताई बुचके, सौ.विजयाताई कुलकर्णी,सौ.मेघाताई डुंबरे,सौ.पूजाताई जालंधर ,सौ.छायाताई केदारी या यजमान म्हणून महिला लाभल्या. हा गंगा आरतीचा उपक्रम श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीदिनी राबवत असल्याचे अध्यक्ष श्री गणेशभाऊ कवडे यांनी सांगितले .हि आरती विघ्नहर मंदिराच्या दक्षिण बाजूस कुकडी नदीतीरावर संपन्न झाली. आजच्या गंगा आरतीचा मान्यवर पाहुण्यांचा सत्कार देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी ट्रस्ट चे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे,सचिव दशरथ मांडे,खजिनदार कैलास घेगडे,विश्वस्त रंगनाथ रवळे,आनंदराव मांडे,मंगेश मांडे उपस्थित होते, यजमान पाहुणे यांनी गंगा आरतीच्या मिळालेल्या मानाबाबत विशेष अभिप्राय दिले.देवस्थान ट्रस्ट ने सुरु केलेल्या गंगा आरतीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.सदर आरतीचा मान महिलांना दिला जाणार म्हणून समस्त नारी यांना याचा विशेष अभिमान असणार आहे असे सौ.विजयाताई कुलकर्णी यांनी गौरव उद्गार ट्रस्ट चे आभार मानताना म्हटले.तसेच या आरतीसाठी रक्कम रुपये एक लक्ष एक हजार देणगी दिली.या आरतीसाठी गायन कुलस्वामी पारवे,साथसंगत सावतामाळी ग्रुप डिंगोरे येथील महिलांनी दिली.फोटोग्राफी सिद्धांत मनसुख,यांनी केले. प्रमुख उपस्थिती म्हणून रविकाका कोते शिर्डी,विशालभाऊ दहिवाल शिर्डी, संतोष नाना खैरे संचालक विघ्नहर स.सा.कारखाना. दिलीप गांजाळे पंचायत समिती सदस्य सुधाकर नलावडे सरपंच धोलवड,यांची लाभली.आरती साठी सत्कार सूत्रसंचालन देवस्थान ट्रस्ट चे खजिनदार कैलास घेगडे यांनी केले.गंगा आरतीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *