पत्रकारांवरील गुन्हा मागे घेण्यात यावा या आशयाचे निवेदन मंचर पोलीस ठाण्यात देण्यात आले

निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्याबद्दल आवाज उठविणाऱ्या पत्रकारांवर निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पत्रकारांवरील सदर गुन्हा मागे घेण्यात यावा या आशयाचे निवेदन आज आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंचर पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील,इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर, पत्रकार परिषद प्रमुख जयेश शहा,विशाल करंडे,विवेक शिंदे,मोसीन काठेवाडी व इतर पत्रकार उपस्थित होते.मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस अधिकारी बालाजी कांबळे व सोमशेखर शेटे यांनी हे निवेदन स्वीकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *