चिंचवडमधील जनतेचा कौल मान्य : नाना काटे

चिंचवडच्या जनतेने स्व. लक्ष्मण जगताप यांना विजयासाठी श्रद्धांजली वाहिली हे निकालातून स्पष्ट झाले. तसेच भाजपने साम-दाम-दंड नीतीचा अवलंब करत ही निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलीस दलाच्या माध्यमातून भाजपने सत्तेचा गैरवापर करत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. चिंचवडमधील जनतेने दिलेला आशीर्वाद मला मान्य आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मागील निवडणुकांच्या तुलनेत एक लाखाचे मताधिक्य घेतले आहे. तसेच महाविकास आघाडीतील मतांच्या विभागणीमुळे आणि भाजपने सत्तेचा गैरवापर करत मिळवलेला हा नैतिक विजय लोकशाहीला शोभणारा नाही. ही निवडणूक भावनिक, दहशत व पैशाचा अमाप वापर करून लढवली गेली. आम्ही ही निवडणूक विकासाच्या जोरावरती लढवली त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतली होती.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय काँग्रेससह पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मला आशीर्वाद दिलेले सर्व मतदार बंधू-भगिनी युवक मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच 2024 ला चिंचवड विधानसभेत महाविकास आघाडीचा आमदार राहील असे आजच स्पष्ट करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *