सुनेचा छळ केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौर व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ ऑक्टोबर २०२१

पुणे

सुनेचा कौटुंबिक छळ, मारहाण, दमदाटी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी च्या माजी महापौर नगरसेविका मंगला कदम यांच्यासह पाच जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेच्या तक्रारीनुसार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत सुनेने अनेक गंभीर आरोप केले आहेतयाप्रकरणी ३५ वर्षीय विवाहितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कुशाग्र कदम, सासरे अशोक कदम, दीर गौरव कदम, जाऊबाई स्वाती कदम यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४९८, ४१७, ३२३, ५००, ५०६, १२० व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि कुशाग्र या दोघांचा विवाह २९ मे २०११ रोजी झाला. लग्न आणि स्वागत समारंभासाठी फिर्यादी यांच्या वडिलांनी ५० लाख रुपये खर्च केला. लग्नाच्या काही वर्षानंतर पतीला लग्नापूर्वीच गंभीर आजार असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले, ही बाब आरोपींनी फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवली. उलट डॉक्टर सोबत संगणमत करून फिर्यादी यांना आजार असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना कृत्रिमरित्या (आय व्ही एफ ) गर्भधारणा करण्यास लावले. पती कुशाग्र यांना दारू पिण्याचे व जुगार खेळण्याची सवय होती ते पार्टीला जात असे. रात्री घरी उशिरा येत याबाबत विचारणा केली असता फिर्यादी यांना शिवीगाळ करून दमदाटी करत होते.।सर्वजण मिळून त्रास देत असे जाऊ बाई सासूला भडकावून फिर्यादीच्या विरोधात कट कारस्थान करत असे. पतीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते.. महिलांचे किंडर ॲप एस्कॉर्ट सर्विसेस, तृतीयपंथी लोकांशी पती संबंध ठेवत होते. असे मार्च २०२०. मध्ये फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करून पतीने त्यांना हाताने मारहाण केली.

लॉकडाऊन च्या काळात पती आणि सासू ने छोट्या छोट्या कारणावरून त्रास दिला २५ जुलै २०२० रोजी फिर्यादी मुलासोबत कायमच्या माहेरी आल्या . आरोपीने ड्रायव्हर कडून फिर्यादी वर पाळत ठेवली. नांदायला न आल्यास तुझ्या जीवाचे बरे वाईट करू. तुझ्यावर ऍसिड टाकायला लावू . तुझी गावात बदनामी करू अशी फिर्यादी यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *