शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण प्रत्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन…

मांजरवाडी मध्ये माती परीक्षण प्रत्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन

नारायणगाव :- (किरण वाजगे)
मांजरवाडी (ता.जुन्नर) येथे मावळ तालुक्यातील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी येथील कृषीदूतांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते .
परिसरातील शेतकऱ्यांमध्ये माती परिक्षण अंतर्गत जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून हा उपक्रन राबविण्यात आला. यावेळी कृषीदूत अनुराग वानखडे, अथर्व देशमुख , केशव गोगडे, हर्षण चौधरी, तपन जैन यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले . या उपक्रमांसाठी महविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ . भाग्योदय खोब्रागडे , कार्यक्रम समन्वयक डॉ . अविनाश खरे व कार्यक्रम अधिकारी डॉ . सचिन कंकाल यांचे मार्गदर्शन लाभले . माती परिक्षण हे पिक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी , रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खत दिल्यानंतर तीन महिन्यानंतर मातीचा नमुना घ्यावा, माती परिक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे असा सल्ला कृषीदूतांनी शेतकऱ्यांना दिला . याचबरोबर शेतीतील मातीचे नमूने गोळा करून त्याचे सुनियोजित परीक्षण करण्यात आले . मातीमध्ये असणारे घटक जमिनीची क्षमता , मातीचा प्रकार या विषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन कृषी दूतां मार्फत करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *