पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अनुराधाताई देविदासमामा गोफणे यांच्यामुळे गरुड या वन्य पक्षाला मिळाले जीवदान

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१२ जुलै २०२२

भोसरी


गवळीनगर भोसरी प्रभागातून फोन आल्यानंतर कार्यक्षम नगरसेविका अनुराधा देविदासमामा गोफणे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी दीपक कोटियाना यांच्याशी तत्काळ संपर्क करून वन्य पशु, पक्षी संरक्षण सामाजिक संस्था विनायक शिवाजी बडदे वन्यजीव सर्परक्षक यांच्याशी संपर्क साधला व सविता टकले यांच्या घरामागील मोकळ्या जागेतून जखमी गरुड पक्षाला ताब्यात घेतले व पुढील उपचारासाठी पाठवले.

त्यावेळी देवीदासमामा गोफणे, अमोल अरगडे, प्रवीण पवार व रोहन कचरे इत्यादी उपस्थित होते. परिसरातील सर्वांनी माजी नगरसेविका अनुराधाताई देविदासमामा गोफणे यांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *