पत्रकार हल्ल्याविरोधात शिरूरला पत्रकार संरक्षण कायद्याची होळी व निदर्शने

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर तेथील आमदार पाटील यांच्या समर्थकांनी भर रस्त्यात केलेल्या भ्याड हल्यात, पत्रकार महाजन गंभीर जखमी झाले होते. या घटनेने त्यांची खूप मानहानी होऊन, त्यांच्यावर खूप मोठा मानसिक आघात झाला होता. आमदारांच्या विरोधातील बातमीचा राग मनात धरून असा भ्याड हल्ला केलेला होता. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. पत्रकार संरक्षण कायदा आहे, परंतु स्थानिक पोलिसांनी त्याचा वापर न करता साधी कलमे लावली होती. त्यामुळे या कायद्याद्वारे कडक कारवाई होऊन, जलदगती न्यायालयात ही केस चालवावी. जर पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर होत नसेल, तर याचा उपयोग काय ? त्यामुळे जो पर्यंत याचा प्रभावी वापर होत नाही, तोपर्यंत समाजातील गुंड प्रवृत्ती अशाच फोफावत राहतील, असे मत यावेळी शिरूर येथे झालेल्या आंदोलनावेळी, अनेक पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या कायद्याची प्रत जाळून राग व्यक्त करण्यात आला. या विषयाचे निवेदन शासकीय प्रतिनिधी म्हणून, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले. यावेळी अनेक संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले होते. शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर, विद्यमान अध्यक्ष संजय बारहाते, शहराध्यक्षा दिपाली काळे, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र खुडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन बढे, जिल्हा संघटक संतोष शिंदे, भारतीय पत्रकार संघाचे प्रांत संघटक अनिल सोनवणे, आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावेळी, पत्रकार प्रवीण गायकवाड, मदन काळे, प्रा सतीश धुमाळ, मुकुंद ढोबळे, पोपट पाचंगे, चेतन पडवळ, नचिकेत काळे, रावसाहेब चक्रे, संदीप भोर्डे, विजय थोरात, अमीन मुलाणी, तुकाराम खोले, शहाजी पवार आदी पत्रकार बांधव सहभागी झाले होते.
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व सचिव अनिल चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही शासनाला पत्रव्यवहार केला असून, शासनाने तातडीने अंमलबजावणी करत पत्रकारांना जलद न्याय द्यावा अशी मागणी केल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *