आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
जनता विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ एस.आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करणेत आला.
या निमित्ताने वाचन संस्कृती टिकावी आणि दिवसेदिवस ती वृद्धींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे असलेले महत्त्व अनन्य असे आहे या निमित्ताने विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकारामशेठ काळे व संस्थेचे मानद सचिव अक्षयशेठ काळे यांच्या शुभहस्ते करणेत आले.
या निमित्ताने सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय शिक्षणाबरोबरच इतरही ज्ञान महत्त्वाचे असते अशा ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ग्रंथालयांचे फारमोठे योगदान आहे असे मत संस्थेचे अध्यक्ष तुकारामशेठ काळे यांनी व्यक्त केले तर ग्रंथालय ही संस्कारांची मंदिरे आहेत आजच्या विज्ञानयुगात स्मार्ट फोनच्या जमान्यातही पुस्तके आणि ग्रंथालय यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
व्यक्तींचा वैचारिक विकास करण्याचे काम फक्त पुस्तकेच करू शकतात त्यासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे असे मत संस्थेचे मानद सचिव अक्षयशेठ काळे पाटील यांनी व्यक्त केले.उद्घाटनानंतर सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, प्राचार्य यांनी ग्रंथ प्रदर्शन पाहण्याचा आस्वाद घेतला सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.शितल पवार सर यांनी केले आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.पातकर सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन विश्वास काळे सर फलके सर ,उजागरे सर आढाव सर यांनी केले .