घोडेगाव – सोशल मीडियावर महात्म्यांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ घोडेगाव पोलिस स्टेशन येथे निवेदन

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ

राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रमाता माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी या महात्म्यांची सोशल मीडिया वरती विटंबना केले बाबत सोशल मीडिया फेसबुक पेजवर राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे व्हिडिओ त्यामध्ये त्यांच्या प्रतिमेचा अवमान होईल व प्रतिमा मलिन होऊन समाजामध्ये द्वेष भावना तयार होऊन अराजकता निर्माण होईल अशा अशाप्रकारे गाण्याचा वापर केला आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुणे जिल्ह्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र संताप व जाहीर निषेध व्यक्त करत आहोत या गंभीर घटनेची दखल घेऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई विनाविलंब करण्यात यावी संबंधितांवर आठ दिवसात सायबर गुन्हे अंतर्गत कारवाई न झाल्यास आंबेगाव तालुका इंडिया आघाडी व सर्व जनतेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल अशा आशयाचे निवेदन घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले निवेदन देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील मनसे नेते संतोष बोराडे, युवा उद्योजक निशिकांत होनराव,विलास पंधारे सर,रियाज शेख आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *