हिंदी चित्रपट स्रुष्टीतील सुपरस्टार अभिनेते दिलीपकुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी हिंदुजा रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.७ जून २०२१ (ओझर): हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईमधील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते .त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी दिली. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे दिनांक 29 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची आज अखेरचा श्वास घेतला. त्यांना यापूर्वीही 6 जूनला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते व 11 जूनला डिस्चार्ज देण्यात आला होता .आपल्या सहज आणि सुंदर अभिनयातून दिलीप कुमार यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत .

अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने या सदाबहार अभिनेत्यास आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *