मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
बिलोली तालुक्यातील संगणक परिचालक आत्महत्या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी करत आंबेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर संगणक परिचालक यांच्या मार्फत निदर्शने करण्यात आली.
ग्रामपंचायत हिप्पर गाथडी ता. बिलोली जी.नांदेड संगणक परिचालक अंबादास नागोराव पेटेकर यांनी csc-spv कंपनीने नाहक दिलेली टार्गेट,कामाव्यतिरिक्त लावण्यात येणारे इतर कामे, तसेच ग्रामपंचायत स्तरावर कामावरून कमी करण्याच्या दिलेल्या धमक्या, राज्य शासन संगणक परिचालकांचा निर्णय घेण्यास टाळाटाळ या सर्व प्रकारामुळे होणारा मानसिक त्रास व दबावामुळे ९ ऑगस्ट २०२३रोजी रात्री १० च्या सुमारास हिप्परगाथडी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात आत्महत्या केली याच्या निषेधार्थ आज दिनांक१४/०८/२०२३रोजी आंबेगाव तालुक्यातील सर्व संगणक परिचालक यांनी पंचायत समिती समोर काळ्याफिती लावून निदर्शने करण्यात आली.आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना निवेदन देण्यात आले.
व संगणक परिचालक कै.अंबादास पेटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी आंबेगाव संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सुशीला काळे उपाध्यक्ष शाहरुख पटेल सचिव संदीप आळेकर,श्वेता काळे व सर्व तालुक्यातील संगणक परिचालक उपस्थित होते.