व्यावसायिक करबुडव्या मिळकत धारकांकडून कर वसुली करावी- माधुरी गोडांबे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


Request given by Madhuri Godambe to the Commissioner
माधुरी गोडांबे यांनी दिले आयुक्ताला निवेदन

पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. या शहरात व्यवसाय करताना अनेक उद्योगपती नियमितपणे सर्व प्रकारचे सरकारी कर भरत असतात. पण पिंपरी चिंचवड शहरात असेही खूप व्यावसायिक मालमत्ता अशा आहेत ज्यांचे कर नियमितपणे भरले जात नाहीत. तरी आपण अशा लोकांवर कारवाई करत नाहीत असे दिसून आले. यामध्ये महानगरपालिकेचे व पर्यायाने या शहरातील नियमित कर भरणाऱ्या नागरिकांचे नुकसान आहे.

आयुक्तसाहेब अशा व्यावसायिक करबुडव्या मिळकत धारकांकडून नियमित कर वसूल करून लोकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. माझ्या माहितीत असलेल्या काही व्यावसायिक मालमत्ता अशा आहेत ज्यांचा कर नियमितपणे भरला गेला नाही. याबाबतची संबंधित माहिती निवेदनासोबत जोडलेली आहे.

त्या मिळकतदारांवर योग्य ती कारवाई करावी व कर वसूल करावा अशी मागणी गोडांबे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

The 'Right to Information Act' on the extent of compliance with the Maharashtra Fire Prevention and Life Saving Measures Act, 2006.
‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपायोजना अधिनियम, २००६’ चे पालन किती होत आहे याचे ‘माहिती अधिकार अधिनियम’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *