माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची शिंदे गटाच्या शिवसेना उपनेतेपदी निवड

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१८ जुलै २०२२


आताची एक अत्यंत महत्त्वाची व ब्रेकिंग बातमी आपल्या हाती येत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिंदे गटाच्या शिवसेना उपनेते पदी निवड करण्यात आली आहे. खेड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना खेड लोकसभा मतदारसंघाचे शेवटचे खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नव्याने अस्तित्वात आल्यानंतर पहिले खासदार होण्याचा मान व एकूण तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची कारकीर्द दैदीप्यमान अशीच ठरली आहे.

आज शिंदे गटाची ऑनलाईन बैठक पार पडली या बैटकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाइन बैठकीला शिवसेनेचे विद्यमान १५ खासदार उपस्थित होते यामुळे आता तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर महाविकास आघाडीमध्ये राहण्याचा निर्णय बदलावा वाटतोय का… किंवा ते पुन्हा सर्वांना एकत्र घेऊन शिवसेना पक्ष वाचवतील का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *