७६ वा स्वातंत्र्यदिन सोहळा चिंचवडच्या श्री.शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा

चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात 77 वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.  प्रमुख पाहुणे म्हणून  इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा.श्री.  अरुण कुमार सिन्हा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष जगदीश दादा जाधव, पालक संघाचे अध्यक्ष ऍड. श्री. गट्टे साहेब रक्षा मंत्रालयाचे पूर्व वैज्ञानिक अधिकारी श्री. कमलकांत मुलकासाहेब, रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल सरवदे साहेब , सचिव श्री. संजय जाधव, संचालक श्री . विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

मा. अरुण कुमार सिन्हा यांनी आपल्या  मनोगतात विद्यार्थ्यांना  चांद्रयान मोहीम तीन मध्ये  शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीचे वर्णन केले.  तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विज्ञान विषय घेऊन शास्त्रज्ञ व्हावे आणि देशाचा नावलौकीक वाढवावा,  अशी इच्छा व्यक्त केली.  देशाच्या जडणघडणीमध्ये   शास्त्रज्ञांचा वाटा मोठा आहे, हे प्रामुख्याने त्यांनी नमूद केले.
तसेच संस्थेने विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिलेल्या सर्व  प्रयोगशाळा  यामध्ये गणित प्रयोगशाळा, भूगोल प्रयोगशाळा संस्कृत प्रयोगशाळा, इंग्रजी प्रयोगशाळा, ग्रंथालय, सायन्स सेंटर  इ. भौतिक व शैक्षणिक सुविधांची पाहणी करून विद्यालयातील उपक्रम आणि विदयार्थ्यांना मिळत असलेल्या यशाचे  विशेष कौतुक  केले.

विदयार्थ्यांच्या वतीने  कु. तनिष्का हिरे (इ 1 ली) या चिमकुल्या विद्यार्थिनीने देशप्रेमाबद्दल  आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावर उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य
श्री. बाळाराम पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  श्री. साहेबराव देवरे, पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय भालेराव, उप मुख्याध्यापक श्री. किसन अहिरे, कमिटी मेंबर सौ. सुषमा संधान, सौ. छाया ओव्हाळ, सौ. मनिषा जाधव व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडाशिक्षक श्री. शब्बीर मोमीन, प्रास्ताविक श्री. दत्तात्रय भालेराव यांनी, तर  सौ. सुषमा संधान यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *