पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

राष्ट्रपती पोलीस पदकांची सोमवारी घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळालं आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा समावेश आहे. या

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची १३ डिसेंबर २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली. चौबे हे पिंपरी चिंचवड शहराचे पाचवे पोलीस आयुक्त आहेत.देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक , 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *