शिरूर बाजार समितीद्वारे कांदा विक्रीसाठी उभारण्यात येणाऱ्या सेल हॉलचे भूमिपूजन, शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

रवींद्र खुडे
विभिगिय संपादक 
१० नोव्हेंबर २०२१

शिरूर 


शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे जिल्ह्यातील शिरूरसह दौंड व शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला कांदा, विक्रीसाठी जवळची सुसज्ज  बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी, शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीने गेल्या चार वर्षापुर्वी नविन मार्केट यार्डवर, जाहीर लिलावाने खरेदी विक्रीचे व्यवहार आडतदारांमार्फत सुरू केलेले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने व मार्केट यार्डवरील कांद्याची आवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने, मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे ऊन, वारा, पाऊस यांपासून नुकसान होऊ नये यासाठी व त्या शेतमालाचे संरक्षण होण्यासाठी, आवश्यक असणाऱ्या शेडची कमतरता होती.

मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कांदा उघड्या जागेवर लिलावासाठी ठेवावा लागत होरा. ऊन, वारा, पाऊस यामुळे अनेकवेळा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते.

या बाबींचा विचार करून, शेतकऱ्यांचा कांदा उतरविण्यासाठी बाजार समितीच्या वतीने लिलावगृहाची (सेल हॉल) उभारणी करण्याचे ठरविले असुन, सेलहॉलच्या जागेचे भूमीपुजन शिरूर हवेलीचे आमदार, ॲड. अशोकबापू पवार यांच्या हस्ते व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतकाका कोरेकर, उपसभापती प्रविण चोरडीया, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी सभापती शंकरदादा जांभळकर, माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, माजी उपसभापती विकासआबा शिवले, संचालक सतिश कोळपे, विजेंद्र गद्रे, बंडु जाधव, प्रभारी सचिव अनिल ढोकले, सामाजीक कार्यकर्ते उमेश भुजबळ, अमोल बोऱ्हाडे, रंजन झांबरे, आडतदार मच्छिंद्र रोडे, संतोष चोरडीया, राजेंद्र गिते, विजय पळसकर, सागर सुर्यवंशी, अजित गोबारे, योगेश पठारे, विकास जगताप, सुशांत पाचर्णे, जितेंद्र कोळपे, सुभाष वाखारे, दौलत बोऱ्हाडे, रामभाऊ हेलावडे तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी, वाहतुकदार, हमाल, मापाडी उपस्थित होते.

यावेळी आमदार ॲड. अशोक पवार यांनी बाजार समितीचे कामकाज अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू असून, दिवसेंदिवस बाजार समितीने शेतकरी हा केंद्रबिंदु ठेवून चांगल्या प्रकारे कामकाज सुरू असलेबाबत संचालक मंडळाचे कौतुक व अभिनंदन केले.

सभापती ॲड. वसंतकाका कोरेकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बाजार समितीचे मुख्यबाजार शिरूर, उपबाजार तळेगांव ढमढेरे, पिंपळे जगताप व पाबळ येथे सुरू असणाऱ्या मार्केटमुळे शेतकऱ्यांना अगदी जवळ शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण झालेली आहे. पुढील काही दिवसात मुख्यबाजार शिरूर व उपबाजार तळेगांव ढमढेरे येथे भव्य प्रशासकीय इमारत उभारणी करणार असुन, उपबाजार वडगांव रासाई येथे शेतमाल विक्री व्यवस्थेसाठी नियोजनबद्ध अशा मार्केटची उभारणी करणार आहोत. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलींसाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, मुलींच्या वसतीगृहाची उभारणी करणार असल्याचीही माहीती त्यांनी यावेळी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *