माजी उपमहापौर घोळवे नंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयासाठी आमदार महेश लांडगे ही आले धावून आले – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली मागणी.

रोहित खर्गे
विभागीय संपादक
७ ऑक्टोबर २०२१

पिंपरी

शिवनेर भूषण शिक्षण महर्षी स्वर्गीय महादेव ऊर्फ तात्यासाहेब गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हरि भक्त परायण रामराव महाराज ढोक यांचे हरिकीर्तन नारायणगाव येथील जयहिंद मंगल कार्यालयात आज संपन्न झाले.

यावेळी गुंजाळ कुटुंबातील सदस्यांनी याप्रसंगी अवयवदानाचे फॉर्म भरून दिले. स्व. तात्यासाहेब गुंजाळ स्मृती पुरस्कार स्व. अरविंद लंबे यांना देण्यात आला. तसेच स्व. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रफित प्रसारित करण्यात आली.

याप्रसंगी राजकीय सामाजिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सहकार कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांमध्ये हरिभक्त परायण संतदास महाराज मनसुख, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरददादा सोनवणे, दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, शिवसेना महिला जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी सदस्या शारदाताई शिंदे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सूरेश भोर, राष्ट्रवादीचे युवानेते अमित बेनके, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, गुलाबशेठ नेहरकर, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व युवासेना राज्य विस्तारक गणेशभाऊ कवडे, माजी सभापती शिवाजीराव खैरे, अनंतराव चौगुले, दुर्गाशेठ बेल्हेकर, एन. एम काळे, वसंतराव भालेराव, सरपंच योगेश पाटे, सरपंच महेश शेळके, हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे, गणेश महाराज वाघमारे, माजी नगरसेवक मधुकर काजळे, ज्ञानेश्वर औटी, गणेश वाजगे, रोहिदास केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन जयहिंद उद्योगसमूहाचे जितेंद्र गुंजाळ, विजय गुंजाळ, धर्मेंद्र गुंजाळ, संजय गुंजाळ, जयवंतराव घोडके व गुंजाळ परिवाराने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *