जनतेचा पैसे कसा वाया घालवला जातो त्याचं उत्तम उदाहरण PCMC चऱ्होली BRT बस स्टॉप-आम आदमी पार्टी चे अंदोलन

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२६ सप्टेंबर २०२२


रविवार दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी चऱ्होली फाटा,आळंदी रोड येथे आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले. मागील 4 वर्षा पूर्वी BRT रस्ता आणि बस स्टॉप बांधून पूर्ण झाला आहे परंतु अजून ही तो सुरू केला नाही.प्रशासन ला विचारले तर ते कधी 10 दिवस तर कधी 1 महिना मध्ये सुरू होईल असे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत या विरोधात आम आदमी पार्टी च्या वतीने अंदोलन करण्यात आले.

बस स्टॉप वर प्रवासी निवारा म्हणुन साधा बसथांबा सुद्धा नाही. पावसाळ्यात लोक भिजत गाडीची वाट पाहत थांबतात.अनेक जेष्ठ नागरिक, महिला, विध्यार्थी, कामगार वर्ग ह्या ठिकाणाहून जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहर तर्फे प्रशासनाला विनंती करण्यात येते की, लवकरात लवकर BRT सुरू करावा आणि तो पर्यंत साधा बस थांबा तिथे उभा करावा अशी मागणी यशवंत कांबळे ह्यांनी केली.

ह्यावेळी चिंचवड विधानसभा कार्यकारी अध्यक्ष यशवंत कांबळे, पिंपरी विधानसभा कार्यकारी अध्यक्ष ब्रम्हानंद जाधव, भोसरी विधानसभा प्रचार प्रमुख स्वप्नील जेवळे, इम्रान खान, कुणाल वक्ते, तसेच इतर कार्यकते उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *