शस्त्राचा धाक दाखवून लुटले

पिंपरी : पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात गुरुवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका तरुणाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले.

हर्ष आनंद (वय 21, रा. पिंपरी. मूळ रा. बिहार) असे फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास संत तुकारामनगर येथून पायी चालत जात असता बॅडमिंटन कोर्ट हॉल येथे एमएच 14 /सीझेड 0069 या दुचाकीवरून  तिघेजण आले.त्यांनी सुऱ्याचा धाक दाखवून फिर्यादीकडील एक मोबाईल फोन, सोनसाखळी, अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण 12 हजार 200 रुपयांचा ऐवज लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *