महिलांसाठी आयोजित आगळ्यावेगळ्या धोंडा-डे व मैत्री-डे मध्ये विविध जाती धर्माच्या महिलांनी सहभाग घेतला : सुमन साळवे, उपतालुका संघटीका शिवसेना.

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १२/०८/२०२३.

नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका तसेच शिरूर आंबेगाव तालुक्याच्या शिवसेनेच्या संघटिका सुमन साळवे, सिमाई आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सीमा पवार यांच्यासह शिरूर तालुक्यातील सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी तसेच विविध बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव तसेच सर्व मैत्रिणी आपल्या दररोजच्या कामाच्या व्यापातून थोडासा वेळ काढुन एकत्र येत, महिलांसाठी एक आगळावेगळा “मैत्री डे” तसेच धोंडा साजरा केलाय.


तालुक्यातील विविध भागांमधून शिरूर येथील महाजन मळ्यात मैत्रिणी एकत्र येत चहापाणी करत सर्वांनी आपल्या मनोगतातून स्व:परिचय करून दिला. आपल्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण तणाव विसरून, गप्पा गोष्टी व विनोद करत, गाणे फुगडीमध्ये सर्व मैत्रिणी रमून गेल्या होत्या. आम्ही महिला नेहमीच आपापल्या कर्तव्यात बिझी असतात, त्यांना कधीही सुट्टी नसते, विरंगुळा नसतो. एखादाच असा कार्यक्रम असतो की तिथे सगळ्या एकत्र जमा होतात, मनमोकळेपणाने गप्पा मारतात. प्रत्येक नात्याला बंधने असतात पण मैत्रीला कधीही बंधन नसते, विचार जुळले की लगेच मैत्री होते, या मैत्रीमध्ये खूप मोठी ताकद असते, एखाद्याच्या सुखदुःखामध्ये “मी आहे ना, तू नको टेन्शन घेऊ.” असे म्हणणारी एखादी हक्काची मैत्रीण आपल्या जवळ असावी, तिच्याजवळ आपण हक्काने आपले मन मोकळे करावे, आपण चुकलो तर तिने आपला कान पकडणारी योग्य सल्ला देणारी आणि आपण चांगले काम केले तर कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारणारी अशी प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मैत्रीण असायलाच हवी. आणि याच भावनेतून आम्ही सर्वजणी एकत्र आल्याचे सुमन साळवे यांनी सांगितले.
जीवनातील दुःख हलकं करण्याचे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजेच मैत्री. म्हणुन जागतिक मैत्री दिनाचे व धोंड्याचे निमित्त साधत, शिरूर तालुक्यातील मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. त्यात छाया सकट, अश्विनी साकोरे, सुरेखा गायकवाड, आशा वाळके, रूपाली आटोळे, मंदा खटाटे, प्रियांका टेमकर, अंजना टेमकर, सीमा चासकर, अनिता सासवडे, सुवर्णा पवार, वैशाली नवले, मंदा थोपटे, ऋतिका भांड, यशोदा अहिरे, सविता देहूपा, सुराया पठाण, नौशाद अवतार, सोमय्या मोमीन, परवीन खान, सविता माळवे, सुहाना शेख, सुजाता सदाफुले, अनिता सोनकांबळे, लता सदाफुले, जया चव्हाण, पुष्पा शिर्के, शमा शेख, आनंदा हरेल, जया गायकवाड, सुंनाबी आदी महिला उपस्थित होत्या.
मंगळवार दि. ८/८ ला सकाळपासून रात्री ८ पर्यंत या धोंडे व मैत्री डे चे व उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केलेले होते. “आम्ही सगळ्याच जाती धर्मातील महिला भगिनी एकत्र जमा झाल्यामुळे आम्हाला खरोखर खूप आनंद झाला असून, हा दिवस आम्ही विसरू शकणार नाही” असे मत अनेकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *