संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन, आमदार महेश लांडगे संभाजी भिडे यांना पाठीशी घालत आहेत ! मोर्चेकरांचा आरोप

१०/०८/२०२३
आपला आवाज न्यूज
आज पिंपरी चिंचवड शहरात संभाजी भिडे यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटना  मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तसेच पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय पक्षांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता हा मोर्चा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावर धडकणार होता याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस सतर्क झाले होते त्यामुळे या मोर्चाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत होता.

मोर्चा सुरू असताना मोर्चा करांना आयुक्तालय पर्यंत जाऊ न दिल्याने मोर्चेकर पोलीस एकमेकांमध्ये काही वेळा पुरते भिडलेले पाहायला मिळाले तसेच या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संघटना, राजकीय पक्ष यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या साठी आक्रमक भूमिका घेतली होती मोर्चेकरांनी संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी  केली तसेच संभाजी भिडे यांना भोसरीचे आमदार महेश लांडगे  पाठीशी घालत असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केलाय  मोर्चेकरांनी महेश लांडगे यांचा देखील यावेळी निषेध व्यक्त केला आहे. भिडे गुरुजींवर कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन याच्यापेक्षा उग्र केले जाईल असे मोर्चेकरांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *