पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली ०९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पुर्व संध्येला क्रांतीविरांच्या स्मरणार्थ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक, येथे मशाल ज्योत यात्रा काढण्यात आली होती.
यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, १९४२ साली याच दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांनी “करेंगे या मरेंगे” अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना “भारत छोडो” हा अखेरचा इशारा दिला होता. स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवून देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्यासाठी दिली गेलेली ही हाक संपूर्ण भारतात पसरली आणि देशाने स्वातंत्र्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल टाकले. आज सुद्धा देशात अशाच क्रांतीची खरी आवश्यकता आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीची नीतिमूल्ये पायदळी तुडवणारे हे हुकूमशाही सरकार इंग्रजांच्या फोडो आणि जोडो नीतीने काम करीत आहे. त्यामुळे या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. अनेकांच्या बलिदानातून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य व घटनात्मक लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची आपली जबाबदारी आहे असे कदम म्हणाले.
यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, मा. महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, विश्वास गजरमल, माजी शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहितुले, महिला अध्यक्षा सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन, आमदार महेश लांडगे संभाजी भिडे यांना पाठीशी घालत आहेत ! मोर्चेकरांचा आरोप
१०/०८/२०२३ आपला आवाज न्यूज आज पिंपरी चिंचवड शहरात संभाजी भिडे यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये पिंपरी…