अनधिकृतपणे जाहिरातबाजी करणाऱ्या १०२ जणांवर गुन्हे दाखल

०१ डिसेंबर २०२२

 पुणे


महापालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे जाहिरातबाजी करणाऱ्या १०२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, अनधिकृत होर्डिंग उभारलेल्या 38 मिळकतींवर बोजा चढविण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार यांनी दिली. शहरात जानेवारी महिन्यात जी-२० आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. त्यापूर्वी शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम लावण्यासाठी महापालिका आयुक्तांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आणि दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने अनधिकृत जाहिरात फलकप्रकरणी एकूण १ कोटी ११ लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे.

शहरात १ हजार ९९१ अनधिकृत होर्डिंग आहेत. त्यामुळे आकाशचिन्ह विभागाने अनधिकृत होर्डिंगविरोधात मोहीम उघडली आहे. त्यानुसार या महिन्यात 136 बेकायदेशीर जाहिरात फलक हटविण्यात आल्याची माहिती डॉ.खेमणार यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *