सरस्वती देवीने किती शाळा काढल्या?; छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

२९ नोव्हेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा देवी सरस्वतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहे.त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भुजबळ यांना चांगलेच सुनावले.

भुजबळ यांनी याआधी मंदिरांमध्ये सरस्वतीऐवजी सावित्रीबाईंचा फोटा का नाही, असा प्रश्न भुजबळांनी केला होता. त्यानंतर आता सरस्वती देवीने किती शाळा काढल्या, असं म्हणत सरस्वतीऐवजी फुले-सावित्रीबाई-शाहू-आंबेडकरंची पूजा करा असं म्हटलं आहे.

यावर रोहित पवार म्हणाले, कोणत्याही देव देवतांचा अपमान होणार नाही. याची काळजी सगळेच घेत असतात. पण त्यांनी केलेलं विधान मी ऐकलेलं नाही. त्यांनी कोणत्या उद्देशाने बोलले माहिती नाही. पण देव देवता, थोर व्यक्ती, धार्मिक अध्यात्मिक हे सर्व गुरू होते. त्यांच्या विरोधात कोणीही बोललं नाही पाहिजे. बोलताना सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. अशा शब्दात त्यांनी भुजबळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *