बारावी परीक्षा : ९४.४४ टक्के लागला निकाल

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांची धाकधूक संपली “हिप हिप हुर्र असा आवाज सगळीकडे घुमला.पिंपरी- चिंचवड शहराचा २४.४४ टक्के निकाल लागला परंतु, गतवर्षीच्या तुलनेत निकाल घटला आहे. दरम्यान, निकाल पाहण्यासाठी शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गर्दी पाहायला मिळाली.
निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष सुरू केला अन् सगळीकडे एकच जोरा निर्माण झाला. एकमेकांना शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांनी यश मित्र- मैत्रिणींबरोबर सेलिब्रेट केले. कोणी पेढे वाटून, तर कोणी एकमेकांना हस्तांदोलन करून बारावीच्या यशाच्या शुभेच्छा दिल्या. हसरे चेहरे आणि आनंदी चेहन्यांनी महाविद्यालयाचे कॅम्पस फुलून गेले होते. एकूणच यंदाच्या निकालांमुळे सगळ्याच महाविद्यालयात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
यंदा शाळेच्या आवारात किंवा कॅफेत मुलांची गर्दी पाहायला मिळाली नाही. बहुतांश पालक आणि मुलांनी घरातच बसून मोबाइल लॅपटॉपवर निकाल पाहिला. शाळांमध्ये निकाल पाहण्याची व्यवस्था केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *