दिवसा घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक घरफोडीचे ०३ गुन्हे उघड

किं.रु.१२,२०,०००/- चे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त

उन्हाळयाचे सुट्टीचे निमीत्त पिंपरी चिंचवड परीसरातील असंख्य रहीवासी आपली राहती घरे बंद करून गावी जात असतात
त्यामुळे मोठया प्रमाणावर घरफोडीचे गुन्हयामध्ये वाढ होते आहे, त्याअनुषंगाने विनयकुमार चौबे साो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अंमलदार नेमुन सतर्क पेट्रोलींग करणेबाबत तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागास सक्त पेट्रोलींग करुन घरफोडीचे गुन्हयांना आळा घालणेबाबत आदेश दिले आहेत.

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी

दि.१७/०५/२०२३ रोजी ११.३० वा ते १७.१५ वा दरम्यान सनं २८/९ शिवराजनगर रहाटणी पुणे येथे चंद्रकांत बाळकृष्ण चव्हाण वय ४८ वर्ष रा. सन. २८/९ शिवराजनगर रहाटणी पुणे यांचे बंद घराचे कडीकोयंडा कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडून घरात प्रवेश करुन परातील १० तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी चोरी करुन नेला,
मजकुरचा गुन्हा रजि.नं. ४८२/२०२३ भाविक ४५४,३८० अन्वये दाखल झाला.

त्या अनुषंगाने गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून गुन्हे घडणारी वेळ व वारंवार गुन्हे घडणारे एरीया मध्ये प्रतिबंधात्मक पेट्रोलींग करत सापळा कारवाई व वाकड पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळया ठिकाणी नाकाबंदी करुन गुन्हयांना आळा घालणे व आरोपींना पकडून गुन्हे उघड करणेबाबत सूचना दिल्या.

त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक व पारंपारीक पद्धतीने तपास सुरु केला. सपोनि संतोष पाटील व त्याच सोबतचे पोलीस स्टाफ पेट्रोलींग करीत जगताप डेअरी ब्रिजखाली येवून चालले असता, त्यांना तेथे अॅक्ट मोपेडवरून एक फिकट निळे रंगाचा टिशर्ट घातलेला इसम येताना दिसला. सदरचा इसम हा शिवराज नगर रहाटणी पुणे येथे घडलेल्या घरफोडीतील संशयीत इसमा सारखा वाटला. परंतु सदरचा इसम पोलीसांना पाहताच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करताच त्यास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव सचिन भिमराव पाटील वय ३२ वर्षे रा. भारत फोर्स कंपनीजवळ, साईपार्क, घोरपडी गाव, घोरपडी पुणे असे सांगीतले

सदरचे इसमास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कंबरेला मागील बाजुस घराचे कडी कोयंडा तोडण्यासाठी “बापरलेला एक स्टिलचा छोटा रोड खोचलेला मिळून आला. सदरचा इसम हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी देखील ०५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत हे निष्पन्न झालेने त्याचकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने वाकड़ व चतुरशृंगी भागातील बंद घर फोडुन घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन ०३ गुन्हे उघड करून १२,२०,०००/- रुपये किंमतीचे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले असून तपास चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *