31 डिसेंबर पासून आळंदीमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा उत्सव

दि. २९/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : आळंदी येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठामध्ये ३१ डिसेंबर पासून वार्षिकोत्सवाची सुरुवात होणार आहे. कोठी पूजनाने या उत्सवाला सुरुवात होईल. 7 जानेवारी रोजी उत्सवाची समाप्ती होणार आहे. 5 जानेवारी रोजी श्रींचा रथयात्रा होणार असून 6 जानेवारी रोजी श्रींच्या मुक्तद्वार समाधी स्पर्श दर्शनाचा भाविकांना लाभ घेता येणार आहे.

31 डिसेंबर ते 6 जानेवारी या काळात मठामध्ये हभप वासुदेव महाराज बुरसे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे. 7 जानेवारी पालखी सोहळ्याच्या दिवशी हभप विष्णुपंत चक्रांकित बुवा यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. भाविकांना 12 जानेवारीला प्रक्षाळपूजेचा लाभ घेता येणार आहे. अशी माहिती तेथील पुजारी, व्यवस्थापक, विश्वस्तांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *