राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या; विधानसभेत महाविकास आघाडीची जोरदार घोषणाबाजी

२६ डिसेंबर २०२२

नागपूर


कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला जमीन वाटप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड अल्प दरात दिल्याचे आरोप झाले. आता अब्दुल सत्तारांचं प्रकरण समोर आलं. यावरून विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनात वेलमध्ये उतरत जोरदार निदर्शने केली आहेत.

विधानसभेत कामकाज सुरू असताना जेव्हा अब्दुल सत्तार यांचा विषय निघाला आणि ते जमिनीचं प्रकरण समोर आलं त्यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, ५० खोके एकदम ओके,सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके,वसुली सरकार हाय हाय,गद्दार बोलो सत्तार बोलो, श्रीखंड घ्या कुणी-कुणी भूखंड घ्या अशा घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांकडून देण्यात आल्या.

अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. शिवाय माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *