६० व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीचं लग्न

बॉलिवूडपासून साऊथपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणारा लोकप्रिय अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. ज्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे. आसाममधील रुपाली बरुआ हिच्यासोबत त्याने कोर्ट मॅरेज केलं आहे. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.
आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
रुपाली बरुआ ही आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहे. तिचे कोलकात्यात फॅशन स्टोअर आणि स्वतःचा व्यवसाय आहे. रुपाली बरुआ ही बुटीक आणि कॅफे चालवते.
रुपाली बरुआ आणि आशिष विद्यार्थी यांना जेव्हा विचारण्यात आले की, त्यांची पहिली भेट कशी झाली आणि ते प्रेमात कसे पडले? तर आशिषने सांगितले की ही एक मोठी कथा आहे आणि तो त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी सांगेन. ती आणि आशिष विद्यार्थी काही महिन्यांपूर्वी भेटले होते आणि त्यांनी त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *