वीजदरात केलेली दरवाढ ईडी सरकारने तात्काळ मागे घ्यावी – सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

शिंदे फडणवीसांना घरचा रास्ता दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (ईडी) सरकारने आज पासून म्हणजे १ एप्रिल पासून घरगुती वीजदरात ६ टक्कयाची वाढ केली आहे. तसेच टोल व एलपीजी सिलेंडर महाग होणार आहेत. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेली तीन लॉकडाऊन त्यामुळे उद्योजक,लघुउद्योजक, लहान-मोठे व्यापारी, सामान्य नागरिक यांच्यावर झालेले विपरीत परिणाम त्यातून सामान्य माणसाच्या हातून गेलेला रोजगार यातून वाढलेली प्रचंड बेरोजगारी तसेच यापूर्वी वारंवार पेट्रोल डिझेल गॅसचे प्रचंड वाढलेले दर यामुळे रोजच्या जगण्या मरण्याच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली प्रचंड दरवाढ यामुळे महिलांचे ढासळलेले किचन बजेट या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी, कामगार,उद्योजक,लघुउद्योजक, छोटे-मोठे व्यापारी व सामान्य नागरिक बेरोजगारी आणि महागाईमुळे मेटाकोटीला आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये  वीजदरात ६ टक्के दरवाढ व टोल, एलपीजी सिलेंडर दरवाढ ही सामान्य माणसाची कंबरडे मोडणारी ठरणार आहे. त्यामुळे या ईडी सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. ही सर्व दरवाढ ईडी सरकारने तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत  सामान्य जनता, कामगार शेतकरी उद्योजक लघुउद्योजक लहान-मोठे व्यापारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा रस्ता दाखवल्या शिवाय स्वस्त बसणार नाहीत. सरकारने याची गंभीरपणे नोंद घ्यावी नम्र विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *