शिरूर रामलिंग सांस्कृतिक भवन येथे 97 नागरिकांना दुसरा कोविशिल्ड लसीचा डोस दिला – नामदेव जाधव, सरपंच

बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर.

रामलिंग :
दि 13/5/2021
शिरूर ग्रामपंचायतचे सरपंच, ऊपसरपंच, सर्व सदस्स, ग्रामसेवक यांनी, शिरूर – हवेलीचे आमदार ऍड अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिरूर कृ .ऊ. बा. समीतीचे सभापती शशीकांत दसगुडे, सेवानिवृत पोलीस कर्मचारी असोसिएशन म. राज्य संघटनेचे राज्यसचिव संपत जाधव यांच्या पुढाकारातून, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी चौथा कॅम्प दि. 12/5/2021 रोजी घेण्यात आला. त्यात एकुण 97 नागरिकांना कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस लसीकरण केंद्रावर देण्यात आला. यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनीही कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला.


शिरूर पंचक्रोशितील नागरीकांना लसीकरणासाठी जवळच्या जवळ लसीकरण केंद्र सुरू झाल्याने व सदर ठीकाणी खुप मोकळी प्रशस्त जागा असल्याने, सोशल डिस्टन्स पाळत आनंदाच्या वातावरणात लसीकरण झाले. तसेच, यापूर्वी 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे 450 नागरिकांनी, लसीचा पहिला डोस रामलिंग सांस्कृतिक भवन शिरूर येथे घेतलेला होता. अशांना दुसरा डोस देखील वेळेत देणे आवश्यक होते. त्यासाठी ग्राम पंचायत व गाव पुढाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यामुळेच, लसीचा दुसराही डोस येथे उपलब्ध करण्यात आला.

      दुसऱ्या डोसचे लसीकरण यशस्वी करण्यासाठी शिरूर ग्रामीणचे सरपंच, ऊपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे सर्व सेवक वर्गाचे चांगले सहकार्य लाभले.
  तसेच तालुका आरोग्य अधिकारी दामोदर मोरे, आरोग्य पर्यवेक्षक रोहिदास नवले, मिसाळ, शीरसाट, परिचारिका अर्चना आराख यांनी लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण करून दिले. त्याचप्रमाणे योग्यवेळी लस ऊपलब्ध करून दिल्याने, या सर्वांचे शिरूर ग्रामचंचायतच्या वतीने सरपंच जाधव यांनी आभार मानले. 

  यावेळी सरपंच नामदेव जाधव, ग्रामसेवक बाळासाहेब शेळके, माजी सरपंच तुषार दसगुडे, सदस्य नितीन बोऱ्हाडे, सदस्य अभिलाश घावटे, सदस्य यशवंत कर्डीले, सदस्स हीराप्पा जाधव, सदस्य अनिल लोंढे, माजी ऊपसरपंच सागर घावटे, राष्ट्रवादीचे ऊपाध्यश अमोल वर्पे, माजी सरपंच विष्णुभाऊ दसगुडे, सामाजिक कार्यकर्ते शरद पवार, शिवाजी दसगुडे, राहुल महाजन, नारायण गायकवाड, ऊद्योजक अतुल जाधव तसेच ग्रामपंचायतीचा सर्व सेवक वर्ग तसेच, माजी सदस्य अनिल वाळुंज, विठ्ठल जगदाळे, त्रिंबक भाकरे, संभाजी लोंढे, सोनु गुंजाळ, सेवा निवृत्त पोलीस संघटनेचे राज्याचे सचिव व मानवधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय ऊपाध्यश संपत जाधव आदींनी स्वयंस्फुर्तीने मोलाचे सहकार्य केले. त्याचप्रमाणे,

लस घेतलेल्या नागरिकांनीही सर्व नियमांचे पालन करून मोलाची मदत केली.
लसीचा तुटवडा असतानाही शिरूर ग्रामपंचायतचे सरपंच, ऊपसरपंच व सर्व सदस्य यांनि 97 लोकांना लसीचा दुसरा डोस मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे शिरूर ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी यांच्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिरूर ग्रामीणचे सरपंच व सर्व सदस्य यांनी लसीकरणासाठी रामलिंग सांस्कृतिक भवन येथे केंद्र सुरू करून नागरिकांची ऊत्तम सोय केल्याने, शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतचे व रामलिंगच्या सर्व पदाधिकारी यांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

    लवकरच लसीकरणाचा पाचवाही कॅम्प शिरूर ग्रामीण ग्राम पंचायत व सर्व सेवाभावी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार असून, पुढील लसीकरणाची तारीख निश्चित झाल्यावर उर्वरित नागरिकांनी लस घ्यावी अशी विनंती, ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत असल्याचे, सरपंच नामदेव जाधव यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

One thought on “शिरूर रामलिंग सांस्कृतिक भवन येथे 97 नागरिकांना दुसरा कोविशिल्ड लसीचा डोस दिला – नामदेव जाधव, सरपंच

  • May 13, 2021 at 3:12 pm
    Permalink

    Very good efforts.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *