न्हावरे येथे बिबट्याच्या हल्यात गाईचे वासरू ठार : पिंजरा लावण्याची किंवा कायमचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
न्हावरे/शिरूर : दि. ३१/०३/२०२३.


आज दि. ३१ मार्च २०२३ रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास, माजी सैनिक पांडुरंग नाना सरके यांच्या घरासमोर बांधलेल्या जनावरांमधून सात दिवसाचे खिलार गाईच्या वासरांवर बिबट्या ने हल्ला केला त्यात ते ठार झाले. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने घरातील लोकांना जाग आल्याने, माजी सैनिक पांडुरंग सरके, अंकुश सरके, रेखा सरके, भानुदास सरके हे बाहेर आले असता त्यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे त्यांनी मोठ मोठ्याने आवाज करत बिबट्याला पळवून लावले. परंतु बिबट्याने हल्ला केलेले वासरू मरण पावले असुन, ते एक जातिवंत व उच्च प्रतीचे खीलार जातीचे वासरू असल्याचे सरके कुटुंबीयांनी सांगितले.

गेले दोन वर्षात सरके वस्ती, तरटे वस्ती, तांबे वस्ती, कुटे वस्ती, सोनवणे वस्ती वरील अनेक शेळया, कुत्रे व पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले असून, न्हावरे गावातील शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्री अपरात्री शेतावर पाणी दयावे लागत असल्याने या घटनांची त्त्वरित व गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकारी, पदाधिकारी, नेते व सरकारने याकडे लक्ष घालावे.
या भागात पिंजरा लावलेला नाही काही किलो मीटर अंतरावर लावलेला आहे. परंतु तब्बल दोन वर्षांपासून बिबट्या या पिंजऱ्यात अडकत नाही, त्यामुळे आम्हाला जीव मुठीत घेऊनच वावरावे लागतेय. हे सर्व अधिकारी व पदाधिकारी एखाद्या माणसाचा जीव जायची वाट पाहत आहेत का ? याबाबत आता आम्ही आणखी कोणाकडे तक्रार करायची ? या भागात पिंजरा लावून किंवा बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करून आम्हा नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी या भागातील रहिवासी तसेच स्वतः अपंग असणारे व प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष असणारे दत्तात्रय तरटे यांनी आपला आवाज न्युज नेटवर्कशी प्रतिक्रिया देताना केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *