एलबीटी थकबाकी, ५३ हजार व्यापाऱ्यांना नोटीसा

०७ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


स्थानिक संस्था कर ( एलबीटी ) थकविणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील ५३ हजार व्यापाऱ्यांना महापालिकेच्या एलबीटी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत . तसेच , थकबाकीदार व विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे . पालिकेने एक एप्रिल २०१३ पासून एलबीटी कर वसुली सुरू केली आहे . तीस जून २०१७ ला एलबीटी रद्द करण्यात आला . एलबीटीसाठी शहरातील ३५ हजार ८ ९ २ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली होती . त्यातील केवळ २० हजार २३३ जणांनी एलबीटी कर भरला आहे . थकीत कर भरण्याबाबत संबंधित व्यापाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले आहे . त्यातील केवळ १० टक्के व्यापाऱ्यांनी कागदपत्रे सार केली आहेत . पाच हजार २३८ जणांना अंतिम कर भरण्याचा आदेश दिला आहे . राज्य सरकार जोपर्यंत एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेत नाही . तोपर्यंत व्यापाऱ्यांना एलबीटी भरणे बंधनकारक आहे . त्यानुसार पालिका एलबीटी वसुली करत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *