डिंगोरे येथील एव्हरेस्ट ॲबॅकस क्लासेस चे घवघवीत यश

 

आंतरराष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत चार विध्यार्थी अव्वल दहा मध्ये

गणित हा विषय ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही अवघड समजला जातो परंतु हाताच्या बोटावर अतिशय सोप्या पद्धतीने गणित सोडवण्याची कला ॲबॅकसने शिकवली,
एवरेस्ट अबॅकस क्लासेसच्या सौ स्नेहल लोहाटे यांनी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेमध्ये उतरवले आणि अवघड वाटणाऱ्या गणिताला सोप्या भाषेत उतरवले
नुकत्याच झालेल्या ऑनलाईल ॲबॅकस स्पर्धेमध्ये 5 ते 14 वयोगटातील राज्यातून 3299 विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता तर एव्हरेस्ट क्लासेस च्या एकूण 14 विध्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन 100 टक्के निकाल दिला, पैकी राज्यात अव्वल दहा मध्ये या पैकी चार विद्यार्थिनींने जास्तीत जास्त गुण मिळवत डिंगोरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवाल्याने परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गशक शिक्षिका सौं स्नेहल लोहाटे यांचे कौतुक होत आहे.

 

त्याच बरोबर पाच मिनिटात 40 पेक्षा जास्त गणिते सोडविणाऱ्या उर्वरित दहा विध्यार्थ्यांवर देखील अभिनंदनचा वर्षाव होताना दिसत आहे
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवीण्यात आले या वेळी सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते, यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशामागे सौं लोहाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले असे मत यावेळी उपस्थित पालकानी व्यक्त केले
राज्यात अव्वल दहा मध्ये आलेल्या चार विद्यायार्थीनि

1 – श्रावानी संतोष पाडेकर= 5 मिनिटात 66 गणिते
2 – नियती तुषार तांबे =5मिनिटात 64 गणिते
3 – अदिती रुपेश डुंबरे =5 मिनिटात 56 गणिते
4 – वेदिका योगेश हांडे =5 मिनिटात 53 गणिते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *