
धनगरवाडी कारखाना फाटा येथील नवसाला पावणारी हाकेला धावणारी मोहटादेवी मंदिराचा वर्धापनदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला,
सकाळी श्रीसूक्ता ने देवीला पंचामृत अभिषेक सौ. अनिता हनुमान शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर आरती घेऊन देवीला पुरणपोळी चा नैवेद्य अर्पण करण्यात आला .
होम हवन, अन्नदान, जागरण गोंधळ, संगीत भजन हे कायँकम दरवर्षी साजरे केले जात होते, परंतु जुन्नर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने , अतिशय कमी भाविकभक्तांमध्ये हा सोहळा संपन्न झाला.यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी योग्य ती खबरदारी घेतली.

मोहटादेवी धर्मदाय फंडातून मंदीरास दोन सतरंजी सेट भेट स्वरूपात देण्यात आला व गोविंद गावडे, शशिकांत वाळुंज ,मच्छिंद्र शेळके, विकासनाना भोर,यांजकडून मंदिराचे विश्वस्त श्री राजेंद्र खिलारी हनुमंत शेळके,अक्षय घुले ,तुकाराम शेळके यांनी तो स्विकारला . ह्या जगदंबा माते कडे करोनाचा लवकर नायनाट होऊ दे व सर्व जनतेला चांगले आरोग्य मिळो दे अशी प्रार्थना मोहोटादेवी मंदिराच्या सर्व विश्वस्तांकडून करण्यात आली .