नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात… लवकरात लवकर होणार सुरू

नारायणगाव
पुणे नाशिक महामार्गावरील खेड ते सिन्नर चौपदरीकरणाच्या कामाअंतर्गत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा रस्ता लवकरात लवकर सुरू होईल अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिली. हा बाह्यवळण रस्ता तात्काळ सुरु करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र हा नवीन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याआधी सुरक्षा विषयक कामे पूर्ण करण्याची आवश्यकता असून वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शनिवारी सायंकाळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


दरम्यान या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राजश्री बोरकर, उद्योजक संजय वारुळे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, जंगल कोल्हे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, शरद बँकेच्या संचालिका पुष्पा जाधव, सुजाता डोंगरे, ज्योती संते, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, आशिष वाजगे, मुकेश वाजगे, सागर दरंदळे, जयेश कोकणे, नितीन शेंडे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी ठेकेदार आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प तसेच इतर विकास कामांविषयी नेमके खासदार डॉ अमोल कोल्हे काय म्हणालेत… याविषयी पाहुयात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *