जुन्नर ता. शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध

 

नारायणगाव दि २३

किरण वाजगे,कार्यकारी संपादक

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह यावर दिलेला निर्णय हा  लोकशाहीला घातक असून चुकीचा असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध नोंदविण्यााठी जुन्नर तालुका शिवसेनेच्या  (उद्धव ठाकरे गट ) वतीने नारायणगाव बस स्थानकासमोर तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले .             जुन्नर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार दि २३ रोजी नारायणगाव बस स्थानकासमोर आयोजीत आंदोलनाला जिल्हा संघटक संभाजी तांबे ,शरद चौधरी, जुन्नर तालुका संघटक योगेश पाटे, दिलीप डुंबरे , मंगेश काकडे , जयवंत घोडके , गुलाब पारखे , बाबा परदेशी , शाम पांडे , मंदाकिनी दांगट,जोस्त्ना महाबरे, मोहन बांगर, सुनील ढवळे, रशिद इनामदार, दिलिप वाजगे, चंद्रकांत डोके, सिद्धिकभाई शेख, रोहिदास तांबे, आरिफ आतार, संजय बनकर आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी माउली खंडागळे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली हा चुकीचा निर्णय दिला आहे . हा निर्णय कायदाला धरून नाही .या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे . त्या ठिकाणी नक्कीच ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय मिळेल अशी आशा यावेळी खंडागळे यांनी व्यक्त्त केली . यावेळी योगेश पाटे ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *