दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत होणार चौकशी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

२२ डिसेंबर २०२२


दिशा सालियन प्रकरणावरून आज विधानसभेत आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न भाजपा आणि शिंदे गटाने केला. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपाने केली होती. यामुळे सभागृहातच मोठा गोंधळ पाहायला मिळाला. झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूबही करण्यात आली. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कधीच सीबीआयकडे नव्हती. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयला विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे नाही, असे सांगितले होते. त्यासंदर्भात सीबीआयचा कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही. याबाबत जे काही पुरावे मांडले जात आहेत. त्याच्या आधारावर कोणताही राजकीय आकस न ठेवता निष्पक्षपणे चौकशी करण्यात येईल. दिशा सालियनचे प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे. याप्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, त्यांनी द्यावे. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *