कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या जनावरांची सुटका, ओतूर पोलिसांची दमदार कामगिरी

 

प्रतिनिधी कैलास बोडके

१२ मुक्या जनावरांना जीवदान

 

बेल्हे ( ता.जुन्नर ) येथून एक टेंपो क्रमांक (एम. एच.04 एच. डी.3984) हा कल्याणच्या दिशेने पाळीव जनावरे कत्तली साठी घेऊन चालला असल्याची गोपिनीय खबर ओतूर पोलिसांना मिळाली असता ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी डुंबरवाडी टोलनाक्यावर नाका बंदी करून सदर टेंपोची तपासणी केली त्यात ११ बैल व एक जर्शी गाय असे एकूण १२ जनावरे निर्दयी पणे दाटीवाटीने कोंबून चारा पाण्याची व्यवस्था न करता कल्याण येथे कत्तली साठी घेऊन चालल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी टेंपोतील पाळीव जनावरे ताब्यात घेऊन त्यांना पांजरपोळ गो शाळा मोशी (ता. हवेली )जिल्हा पुणे येथे सुरक्षित दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
महाराष्ट्र प्राणी संरक्षक व प्राण्यांचा छळ अधिनियम कायद्या नुसार 1)निसार गुलाब खान वय 50 वर्ष, 2)फईम सादिक कुरेशी वय 24 वर्ष रा. कल्याण जिल्हा ठाणे या दोघांना ताब्यात घेतले असून बेल्हे येथील वसीम नामे इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस हवालदार महेश पटारे,नरेंद्र गोराणे ,सुरेश गेंगजे, बाळशीराम भवारी, जनार्दन सापटे, दत्ता तळपाडे,देविदास खेडकर,नामदेव बांबळे, राजेंद्र बनकर, जोतिराम पवार यांनी केली असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस नाईक नामदेव बांबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *