तळवडे मध्ये भीषण आग, आगीत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू!

पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या फाटकाच्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. ही घटना आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली असून वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्ती आणि फटाक्यांची हि कंपनी होती. यामध्ये ६ महिला कामागारांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक कामगार या मध्ये जखमी झाले आहेत.

या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आहेत. तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आत-बाहेर जाण्यासाठी एकच शटर असल्याने या महिला कंपनीत अडकल्या.
स्फोटाच्या आवाजाने हा शटर बंद झाले आणि आतमध्ये अडकलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यापैकी काही महिला अजूनही जखमी आहेत.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येण्यापूर्वी नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलवले होते. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका आयुक्त शिखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *