प्रा.रवींद्र खुडे यांची पत्रकार संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी २ वर्षांसाठी फेर निवड

विभागीय संपादक रवींद्र खुडे

दि. १४/०२/२०२३ 

 

पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी झगडणारी व संपूर्ण देशभर विस्तार असणारी पत्रकार संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा ग्रामीण, शहर व तालुक्यातील नियुक्त्या, रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी, मांजरी खुर्द येथील कै. ह भ प उंद्रे महाराज चौकातील, पत्रकार संरक्षण समितीच्या पुणे जिल्हा कार्यालयात, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व संघटनेचे सचिव अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याची माहिती, संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे पा. यांनी दिली.

 


या सर्व नियुक्त्या दोन वर्षांसाठी म्हणजेच डिसेंबर २०२४ पर्यंत असुन, जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे पा. व जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. रवींद्र खुडे यांच्या हस्ते देण्यात आल्या असुन, अजुनही काही नियुक्त्या येत्या काही दिवसांत होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उंद्रे पा. यांनी दिली.
जिल्हा सचिव पदी योगेश नाथाभाऊ उंद्रे पा. (मांजरी खु ll), जिल्हा सल्लागार ॲड संतोष शिंदे (पुणे), जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती पल्लवी चांदगुडे (बारामती), पुणे शहर अध्यक्ष रोहित दळवी (पुणे), जिल्हा उपाध्यक्ष शिलवंत कांबळे (मांजरी), बाळासाहेब सुतार (इंदापूर) व प्रशांत तुपे (बारामती), हवेली तालुकाध्यक्ष प्रा. सुरेश वाळेकर, हवेली उपाध्यक्ष डॉ. मोहन वाघ, इंदापूर तालुकाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ सरवदे, बारामती तालुकाध्यक्ष अमोल यादव आदी नियुक्त्या यावेळी देण्यात आल्या.
तर जिल्हाध्यक्षपदी नाथाभाऊ उंद्रे पा., व जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रा. रवींद्र पं. खुडे यांना आणखी दोन वर्ष मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी दिली.
रवींद्र खुडे हे आपला आवाज केबल टिव्ही चॅनेल व न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *