निगडी येथे झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत खुर्शीद मालेगाव संघाने पटकावला चषक

रोहित खर्गे
विभागीय संपादक
निगडी- दि १६ फेब्रुवारी २०२३

 

दिवंगत महापौर मधुकरराव पवळे स्पोर्ट्स क्लब यमुनानगर निगडी आयोजित दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत महापौर मधुकरराव पवळे स्पोर्ट्स क्लब यमुनानगर आयोजित दि १५ फेब्रुवारी रोजी दिवसरात्र पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत खुर्शीद मालेगावच्या संघाने सातारा जिल्हा संघावर अतिशय अटातटीच्या लढतीत २१-१८ असा रोमहर्षक विजय मिळविला.

कै. केशवराव ठाकरे क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेचे उदघाटन माजी क्रीडा सभापती उत्तम केंदळे, मनसेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब घोलप, उपमहापौर तुषार हिंगे, दिशा सोशल फाऊंडेशन चे माजी अध्यक्ष गोरखशेठ भालेकर, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सरचिटणीस संजय जगताप यांच्या हस्ते क्लबचे अध्यक्ष रोहित खर्गे कार्याध्यक्ष आलम शेख, माजी अध्यक्ष तुकाराम राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.

राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील आणि पुणे जिल्ह्यातील नामवंत 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. दिवसरात्र खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत अतिशय अटतातीच्या लढती पाहायला मिळाल्या आणि तेव्हडेच अनपेक्षित निकालही लागले. महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय खेळाडू असलेल्या बलाढ्य टेंभुर्णी संघावर उपाउपांत्य फेरीतच सातारा संघाचे विजय जाधव आणि सहकाऱ्यांनी नेत्रदीपक खेळ करत स्पर्धेचा मानकरी वाटणाऱ्या संघावर मात केली. त्यानंतर झालेल्या उपांत्य फेरीतही महाराष्ट्रचे माजी कर्णधार अमीर काजी यांच्याही संघावर रोमहर्षक मात करीत अंतिम फेरीत प्रवेश करून प्रेक्षकांची मने जिंकली. अंतिम फेरीत सगळया बलाढ्य संघावर मात करत आलेल्या सातारा संघ आणि खुर्शीद मालेगाव यांच्यातही खूप अटातटीची लढत झाली सर्वांचा अंदाज चुकवत खुर्शीद मालेगाव संघाच्या खुर्शीद ने चौफेर टोलेबाजी करत सातारा संघावर विजय मिळवला. आणि दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप चषकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे, शशिकरण गवळी, क्लबचे अध्यक्ष रोहित खर्गे, खेळाडू संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भोंडवे, आलम शेख, तुकाराम राऊत, कैलास तपकिरी, जालिंदर चव्हाण, सुनील जाधव, अमोल बुट्टे पाटील, उत्तम काळभोर, राजेश सोडळ यांच्या हस्ते पार पडला.

स्पर्धेमध्ये चोख कामगिरी बजावणारे राष्ट्रीय पंच नंदकुमार भोईटे, जावेद मनोरे, राजेश तांबे, सुनील गायकवाड, के डी वाघमारे तसेच महाराष्ट्रातील नामवंत राष्ट्रीय खेळाडूंबरोबर क्लबचा राष्ट्रीय खेळाडू सध्या महाराष्ट्र संघाचा कर्णधार प्रदीप कोल्हे याचा सत्कार स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच याच मैदानावर पासिंग व्हॉलीबाल खेळणाऱ्या युवा व युवती खेळाडूंचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचा निकाल-

प्रथम क्रमांक- खुर्शीद मालेगाव
द्वितीय क्रमांक- सातारा जिल्हा
तृतीय क्रमांक – सेक्रेटरी सेव्हन महाराष्ट्र
चतुर्थ क्रमांक- अमीर माळशिरस
पाचवा क्रमांक- शासकीय दूध डेअरी पुणे ‘अ ‘
सहावा क्रमांक- जयंत घोरपडे टेंभुर्णी
सातवा क्रमांक- कावेरी नगर वाकड ‘अ’
आठवा क्रमांक- बुलढाणा जिल्हा

वैयक्तिय बक्षिसे-

मॅन ऑफ दि सिरीज- विजय जाधव- सातारा जिल्हा
उत्कृष्ट शूटर – खुर्शीद मालेगाव
उत्कृष्ट नेटमन – अक्षय पवार , सीलेक्टड सेव्हन
उत्कृष्ट फिल्डर – नाना चौगुले टेंभुर्णी
उत्कृष्ट सर्व्हीसमन – बालन सातारा
शिस्तबद्ध संघ- एस एम चैतन्य पिंपरी पेंढार जुन्नर

दिवसरात्र खेळविलेल्या या स्पर्धेसाठी शहरातील माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यात पुणे नगरीचे माजी नगरसेवक उदय महाले, पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर तुषार हिंगे, गणेश लंगोटे, दिलीप दातीर पाटील, संजय बोऱ्हाडे, प्रसाद कोलते, अण्णा भुजबळ आदी मान्यवरांनी हजेरी लावली.

या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्लबचे माजी अध्यक्ष तुकाराम राऊत, ज्ञानेश्वर पवळे, राजेश सोढळ, प्रदीप कोल्हे, विजय गांगुर्डे, रवी शिंदे, सारंग येवलेकर, कैलास तपकिरी, महादेव खरात, जितेंद्र जगताप , नितीन केदारी, संभाजी नेवगिरे, भीमराव कुंभार , विजय नातू, अनिल राऊत, सोहेल मुल्ला, एकनाथ मोरे, मनोज सोनवणे, राजू जागींड, सालाईत गौस, समिर खान, बबन मगर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद जगताप आणि के डी वाघमारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *