चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप व नाना काटे यांनी घेतला उमेदवारी अर्ज

अतुल परदेशी
मुख्य संपादक
दि.02/02/2023


 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणेकडे सर्वांचेच लक्ष लागलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज नेल्याची बातमी समोर आली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस चे नाना काटे यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे…

लक्ष्मण जगताप यांच्या घरातून त्यांच्या कुटुंबीयांपैकी बंधु शंकर जगताप की पत्नी
अश्विनी जगताप दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा तिढा सुटला नसताना आज गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या कार्यालयातून नामनिर्देशन पत्र घेऊन गेले ची नोंद झाली आहे.

अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अश्विनी जगताप की शंकर जगताप यापैकी कोण असेल याची उत्सुकता तमाम पिंपरी चिंचवडकर वासियांना लागली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी असतानाही आज 2 फेब्रुवारी अखेरपर्यंत भारतीय जनता पार्टी अथवा महाविकास आघाडी यांच्याकडून अद्यापही अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही.

महाविकास आघाडी ही जागा लढवण्यासाठी इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून नाना काटे हे निवडूनक लढण्यास इच्छुक असून आज 2 फेब्रुवारी रोजी त्यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे…विरोधी पक्षनेते अजित पवार हे कसबा पोटनिवडणुक उमेदवार व चिंचवड विधानसभेचे उमेदवारवारांची चाचपणी करण्यासाठी आज पुणे शहरात तळ ठोकून असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *