उद्यापासून शहरातील कोरोना लसीकरनाला पूर्ववत सकाळी १० पासून सुरवात- डॉ पवन साळवे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :- दि ९ एप्रिल २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात कोरोना लसीचा तुटवडा होता त्यामूळे आज शुक्रवार दि ९ एप्रिल रोजी शहरातील लसीकरनाला ब्रेक लागला होता.
लस संपल्याची बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली होती. जे राजकारणी आणि प्रशासन लस घेण्याविषयी आवाहन करत होते तेव्हा वारंवार विनंती केल्यानंतर नागरिक लस घेण्यासाठी येत होते. पण लस संपल्याचे समजताच परत लस केव्हा मिळेल याची शाश्वती नसल्याची भावना काही नागरिकांमध्ये असल्याचे आज यमुनानगर निगडी येथील लसीकरण केंद्रावर पाहायला मिळाली. येथे रोजपेक्षा आज खूप गर्दी असल्याचे चित्र दिसले. म्हणजे नागरिकांना फुकट ची आणि उपलब्धतेच्या किंमत नसल्याचेही दिसले. लस नाही ही बातमी पसरल्यावर नागरिक अस्वस्थ झाले व लसीकरण केंद्रावर घिरट्या घालताना दिसले.
अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ पवन साळवे यांनी दिलासादायक बातमी दिली की कोविल्डशिल्ड लसीचे २०००० डोस प्राप्त झाले असून उद्या सकाळी १० वाजल्यापासून शहरातील सर्वच लसीकरण केंद्र सुरू असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *