स्वर्गवासी माजी आमदार लता नानी तांबे यांच्या कुटुंबाचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी केले सांत्वन..

प्रतिनिधी-कैलास बोडके

जुन्नर तालुक्याच्या पहिल्या महिला माजी आमदार ओतूर गावच्या श्रीमती लता नानी श्रीकृष्ण तांबे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी ओतूर येथील त्यांच्या निवास स्थानी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

ओतूर येथील कपर्दिकेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या त्या मातोश्री होत्या.जुन्नर तालुक्याच्या त्या पहिल्या महिला माजी आमदार असून तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे. राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळताच ओतूर पोलिस स्टेशनच्या वतीने जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अशी माहिती ओतूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी तांबे यांच्या घरी भेट देऊन जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.या प्रसंगी जुन्नर चे आमदार अतुल बेनके,तहसिलदार हनुमंत कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, सभापती विशाल तांबे ,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, अंकुश आमले,ओतूर गावच्या प्रथम नागरीक गीता पानसरे ,उपसरपंच प्रेमानंद अस्वार, विनायक तांबे, जालिंदर पानसरे जयप्रकाश डुंबरे,सतीश जाधव आदीउपस्थित होते.

Advertise