चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक | पहिल्याच दिवशी 20 उमेदवारी अर्ज घेऊन गेल्याची झाली नोंद

प्रसन्न तरडे
पिंपरी-चिंचवड
दि.31/01/2023

 

 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर 18 जानेवारी रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली. 31 जानेवारी 2023 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांना  उमेदवारी अर्ज घेण्याची व भरण्याची तारीख जाहीर झाली आहे.

पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार उतरण्याची तयारी सुरू असली तरी चिंचवड विधानसभा निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार देखील अनेक आहेत.

आज 31 जानेवारी  उमेदवारी अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी 20 इच्छुक उमेदवारांनी  नामनिर्देशन पत्र निवडणूक कक्षा कडून घेऊन गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी 20 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज घेऊन गेल्याने शहरातील राजकीय वातावरणात सर्वांच्याच भुया उंचावल्यात आहेत.याची माहिती चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे उपाधिकारी अजित पाटील यांनी आपला आवाजशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *