विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तत्काळ कार्यवाही करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचना

पुणे : –
आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी
केंद्रीय मंत्री मा. प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत’ आढावा बैठक पुणे येथे घेण्यात आली. यावेळी आरोग्य सुविधा वाढवण्यासोबतच हॉटस्पॉटमधील बंधने पाळली जातील, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकानं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे. ट्रॅकिंग, टेस्टिंगचे काम प्रभावीपणे करा. बेड व्यवस्थापन तसंच रेमडेसिवीरबाबत कडक धोरण राबवा, असे निर्देश या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नाला सर्वांचे पाठबळ महत्त्वाचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार आणि सुविधांमध्ये सातत्यानं वाढ करत रहा. त्याचप्रमाणे महानगरासह ग्रामीण भागातही ऑक्सिजनयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या, अशा सूचना बैठकीत उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांनी केल्या. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ज्या उपाययोजना सांगत आहे; त्याचे पालन करा. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तत्काळ कार्यवाही करावी. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आरोग्य सुविधा उभारणीवर भर देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *