वाटसरुंना लुटणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात

पिंपळगाव जोगा ( ता. जुन्नर )

येथील शेतमजूरास मारहाण करुन लुटणा-या भामट्याला ओतूरला पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडले आहे गणेश पानसरे असे या पकडलेल्या भामट्याचे नाव आहे.
पिंपळगावजोगा येथील शेतमजूर विजय केदार हे शेतात पाणी भरण्यास दुचाकी वरून जात असताना त्यांना एका भामट्याने रस्त्यात अंधाराचा फायदा घेत अडवून मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल व पाचशे रुपये बळजबरीने काढून पोबारा केला या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना मिळताच त्यांनी रात्रीच्या वेळी गस्ती वर असलेले पोलीस नाईक सुरेश गेंगजे, बाळशीराम भवारी यांना सूचना केल्या नंतर त्यांनी देखील ताबडतोब नाका बंदी करून नाकाबंदी दरम्यान गणेश पानसरे यास मोठ्या शिताफिने पकडले व त्याची अंग झडती घेतली असता अंग झडतीमध्ये चोरी केलेला मोबाईल व पाचशे रुपये आढळून आले तसेच त्याच्या त्याच्याकडे एक दुचाकी क्रमांक (एम एच १४जि के ०५०७)ही देखील चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली आहे. या घटनेची फिर्याद विजय केदार यांनी ओतूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली असून या फिर्यादीवरुन
गणेश पानसरे राहणार पानसरे वाडी (ओतूर ) याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, यांच्या आदेशानुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे,पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस नाईक सुरेश गेंगजे, बाळशीराम भवारी यांनी केली आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक आकाश शेळके करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *