यशस्विनी वेलफेअर फौंडेशनच्या वतीने दिव्यांग महिलांना मोफत फॅशन डीझायनिंग कोर्स…

(बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक)
शिरूर शहरात यशस्विनी वेलफेअर फौंडेशनच्या वतीने, दिव्यांग महिलांसाठी मोफत फॅशन डीझायनिंग कोर्स सुरू करण्यात आलाय.
या संस्थेच्या सचिव नम्रता गवारे यांनी सांगितले या मोफत कोर्समागे  संस्थेचा एवढाच उद्देश आहे की, अशा गरजू महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करून, थोडाफार आर्थिक हातभार मिळेल हाच आहे.
संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे  नऊशेहून अधिक महिलांना, विविध कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिल्याची माहिती त्यांनी दिली. संस्था सुरू करून सात वर्षे पूर्ण झाली असून, अध्यक्षा दीपाली शेळके, उपाध्यक्षा संगीता मल्लाव, सचिव नम्रता गवारे, सदस्या सुरेखा शेळके, वैशाली थिटे, शोभा पोळ, वनिता आढाव या आहेत.
संस्थेमार्फत तयार केलेले घरगुती वस्तू व साहित्यांची विक्री विविध दुकाने, मॉल्स, प्रदर्शने इ ठिकाणे केली जाते. आलेला आर्थिक फायदा हा त्या त्या बचत गटांच्या महिलांना त्यांच्या कामाप्रमाणे वाटला जातो.
महिलांसाठी विविध स्पर्धा खेळ घेतले जातात.
तसेच महिलांना सामाजिक प्रबोधन तसेच त्यांच्यावरील अन्याय आत्याचार  झाल्यास, संस्था भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहत असल्याचेही गवारे यांनी सांगितले.
आता MIDC मधील विविध कंपन्यांचे कॅन्टीन्स मध्ये महिला बचत गटांना अन्न शिजवून देण्यासाठी प्रयत्न, ST स्टँड व विविध शासकीय ठिकाणचे कॅन्टीन्स संस्थेच्या बचत गटांना चालवायला मिळविणे असे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.